भाजपाकडून स्विकृत्त नगरसेवक पदासाठी मिथून भिसे निश्चित | उद्या होणार निवड ; विलासराव जगताप यांच्याकडून युवा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न

जत,संकेत टाइम्स : अनेक दिवसापासून चर्चेत असलेले भाजपाच्या स्वीकृत्त नगरसेवक पदाचा कार्यक्रम उद्या ता.9 रोजी होणार आहे. या पदासाठी अखेर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जत येथील भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा मिसे यांचे बंधू तथा युवक नेते मिथून भिसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पक्षात कोणही नाराज झाले नसून सर्वानुमते या नावाला पंसती मिळाल्याचे जगताप यांनी संकेत टाइम्सशी बोलताना सांगितले.येणाऱ्या निवडणुकीत इतरांना संधी
दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जत नगरपरिषदेत भाजपचे सात नगरसेवक निवडून आले आहेत.नियमाप्रमाणे एक स्वीकृत नगरसेवक पदाची जागा भाजपला मिळते.पहील्या टप्यात माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांना संधी मिळाली होती.त्यांनी तीन वर्षे चांगले काम केले. त्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणून उमेश सांवत यांनी राजीनामा दिला होता. 


त्यामुळे या रिक्त जागेवर कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. भाजपकडून गौतम ऐवळे,पापा कुंभार, मकसुद नगारजी यांच्यासह रिपाईनेही मागणी केली होती.परंतु सर्व नगरसेवक, पदाधिकारी  यांचे म्हणणे ऐकून घेवून अखेर मिथून भिसे यांच्या नावावर एकमत करण्यात आले आहे.
जत शहरातील जगताप यांचे विश्वासू असलेले अण्णा भिसे‌ यांचे मिथुन हे त्यांचे बंन्धू आहेत.शहरात मोठ्या प्रमाणात या कुंटुबियाचे संघटन आहे.एकनिष्ठ असलेल्या भिसे कुंटुबियांना यावेळी जगताप यांनी संधी दिली आहे.भाजपाची युवकांची फळी यामुळे मजबूत होणार आहे.