शेगावमध्ये कापड व्यापाऱ्याचे घर फोडले | पावनेचार लाखाचा मुद्देमाल लंपास ; एका संशयिताला पकडले

जत,संकेत टाइम्स : शेगाव ता.जत येथील विनोद विलास भोइटे यांचे बंद घर फोडून चोरट्यानी 3 लाख‌ 80 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.या प्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान पोलीसांनी लगतच्या काही सीसी टिव्हीतील चित्रणावरून एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, शेगाव येथील विनोद भोइटे यांचे शेगावमध्ये वैष्णवी क्लॉथ सेंटर हे कापड दुकान आहे.त्यांनी बुधवारी दिवसभर व अगोदरच्या काही दिवसात विक्री झालेले असे तीन लाख रूपयाची रोखड गुरूवारी खरेदीला जाण्यासाठी घरी आणून ठेवली होती. 

रात्री दहाच्या सुमारास पावने आल्याने गावातील घर बंद करून विनोद भोइटे कुंटुबियासह शेतातील घरात मुक्कामाला गेले होते.मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडीकोयडा तोडून घरामध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेले रोख तीन लाख,70 हजार रूपये किंमतीच्या 3 सोन्याच्या अंगट्या,10 हजार रूपयाचे चांदीचे दागिणे असा तीन लाख आंशी हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे.अधिक तपास जत पोलीसांकडून सुरू आहे.


दरम्यान जत तालुक्यात चोऱ्यांच्या घटना पुन्हा वाढत असून बंद घरे चोरट्याच्या रडार वर आहेत.
गेल्या एक-दीड वर्षात घरफोडीच्या घटनेचे तपास लागलेले नाहीत.नागरिकांनी मोठ्या कष्ठाने जमविलेल्या रोकड,सोने चांदीचे दागिणे,किंमती वस्तू चोरट्याकडून पळविल्या जात आहेत.