अज्ञात वाहनाच्या धडकेत‌ महिलेचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील जगताप पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने‌ धडक दिल्याने महिलेचा मुत्यू झाला.सुभद्रा कोळी (वय 60,रा.जत)असे मुत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.घटना 26 मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, शहरातील जगताप पेट्रोल पंपानजिक सुभद्रा कोळी या चालत जात असताना पाठीमागून अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.


त्यांनतर कोळी यांना महादेव अणाप्पा तुळजनवार यांनी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर त्यांची प्रकृत्ती खालावल्याने सांगली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला.याप्रकरणी डॉ.निखिल सोनकांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.विश्रामबाग‌ पोलीस ठाण्याकडून हा गुन्हा जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.