माडग्याळ ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार | कामे न करताच संरपच,ग्रामसेवकांने निधीवर मारला डल्ला ; चौकशीच्या मागणीचे निवेदन

जत,संकेत टाइम्स : तीव्र दुष्काळ व सततच्या पाणी टंचाईने पिचलेल्या माडग्याळ ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी असलेल्या जल जीवन मिशन योजनेची कामे न करताच संरपच,ग्रामसेवक,ठेकेदारांने निधी हडप केला असून यांची खातेनिहान चौकशी करावी,अशी लिंबाजी माळी,जेटलिंग कोरे व अन्य सदस्यांनी केली आहे.यासह अनेक योजनेत संरपच,ग्रामसेवक यांनी सगनमत करून मोठा भ्रष्टाचार केला असून मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी कामे न करताच हडप केला आहे,ग्रामपंचायतीच्या गेल्या चार वर्षातील कारभाराची खातेनिहान चौकशी करावी अशी मागणीही माळी व कोरे यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील शाळातील मुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून भारत सरकार व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअतर्गंत मोठा निधी माडग्याळ येथील आठ शाळात पाणी उपलब्ध करण्यासाठी देण्यात आला आहे.


त्यांचे संरपच,ग्रामसेवक यांनी रितसर टेंडर काढून कामे सुरू केली होती. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी हस्तांतरण करून पाच शाळात बोअरवेल्स सह अन्य कामे केल्याचे एमबीही बनविण्यात आला आहे. मात्र पाचपैंकी दोनच शाळात बोअरवेल मारण्यात आली आहे. अन्य ठिकाणी बोअर न मारताच नियमबाह्य शाळा लगतच्या खाजगी शेतकऱ्यांच्या जून्या कुपनलिकामध्ये मोटार टाकून पैसे हडप करण्याचा प्रयत्न संरपच,ग्रामसेवक,ठेकेदार, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.प्रत्यक्षात नियम डावलून अत्यल्प पाणी असलेल्या बोअरवेल्स व पिण्यायोग्य पाणी नसलेल्या ठिकाणी काम केले आहे. विशेष म्हणजे ज्या बोगस बोअरवेल्समध्ये पाण्याची उपलब्धता, पाणी पिण्यायोग्य आहे का नाही,यांचे‌ परिक्षण पुर्ण करून मान्यता देणे योजनेच्या नियमावलीत असतानाही माडग्याळमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्मादर्शन केल्याने सर्व नियम ढाब्यावर बसवून परवानगी देण्यात आली आहे.यासह ग्रामपंचायतीने केलेल्या चार वर्षातील कामामध्ये कामे न करताच निधी हडप केला असून त्यांची गटविकास अधिकारी यांची स्वतंत्र कमिटी नेमून तपासणी करावी,अन्यथा आमरण उपोषणास बसू असा इशारा लिंबाजी माळी व जेटलिंग कोरे यांनी दिला आहे.