जमिन वाटून दे म्हणत आईवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला

0



जत,संकेत टाइम्स : ‌जमिन वाटून दे म्हणून मुलगा,सुनेने सासूवर  कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोरडी ता.जत येथे घडली आहे. यात सुंदराबाई पांडुरंग चौगुले रा.सोरडी या जखमी झाल्या आहेत.शिवाजी पांडुरंग चौगुले,मिराबाई शिवाजी चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Rate Card



अधिक माहिती अशी,फिर्यादी सुंदराबाई चौगुले यांची सोरडी येथे शेतजमिन आहे.त्यात मुलगा शिवाजी चौगुले हा वाटणी मागत होता.गेल्या अनेक दिवसा पासूनचा हा वाद गुरूवारी उफाळून आला.फिर्यादी सुंदराबाई यांना भिमाण्णा यांची जमिन वाटून दे म्हणून शिवाजी चौगुले व मिराबाई चौगुले यांनी कुऱ्हाडीने हल्ला केला.यात सुंदराबाई गंभीर जखमी झाल्या आहेत.यावेळी झालेल्या झटापटीत सुंदराबाई यांची बोरमाळ हरविली आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.