जतेतील कन्नड बाहुल गावात मराठी शाळा संदर्भात मुंबईत बैठक

जत,संकेत टाइम्स : जतसह कन्नड बहुल सीमा भागातील मराठी शाळांच्या प्रश्नांसंदर्भात जत विधानसभा मतदरसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विनंतीवरून शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. या शाळांसाठी अनेक विविध सुविधा निर्माण करण्याबरोबरच शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तयार केलेल्या आराखड्या बाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.


यावेळी मराठी भाषा खात्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, आ.विक्रमसिंह सावंत.आ.अभिजित वंजारी.आ.जयंत आसगावकर व शालेय शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जत तालुक्यात कन्नड बाहुल भागात‌ कन्नड शाळा आहेत.मात्र मराठी शाळा नाहित.त्यामुळे महाराष्ट्रात‌ राहूनही राज्यातील काही गावातील मुलांना मराठी शिकता येत नाही.त्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह सांवत यांनी जत तालुक्यातील परिस्थिती शिक्षण मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर मांडली.


जत तालुक्यातील कन्नड बाहूल गावात मराठी शाळा उभारण्याबाबत‌ शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.