जतेत खड्ड्यात वृक्षारोपन | रिपाइंकडून प्रशासनाचा निषेध करत आंदोलन ; तातडीने खड्डे भरा

जत,संकेत टाइम्स :  जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता सद्या खड्डेमय झाला,असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही.त्यामुळे आज प्रशासनाचा निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही जत शहरातील सर्वच रस्त्यांच्या निकृष्ठ व दर्जाहिन कामासंदर्भात सबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु सबंधित विभागाने याकडे लक्ष दिले नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा आक्रमक पक्ष असून रस्त्याची व इतर कामे ही दर्जात्मक व्हावीत ही आमच्या पक्षाची भूमिका आहे.
त्यामुळे निकृष्ठ व दर्जाहिन कामे करणारे ठेकेदार यानी लक्षात घ्यावे की, यापुढे जत शहरासह तालुक्यात निकृष्ठ व दर्जा हिन कामे ठेकेदारानी केली तर आम्ही ही कामे सबंधित ठेकेदार यांच्याकडून दर्जात्मक अशी कामे करून घेतल्याशिवाय ठेकेदारांना सोडणार नाही. याची सबंधित कामाचे ठेकेदार यानी नोंद घ्यावी व कामे चांगल्या प्रकारे करावीत असा इशारा कांबळे व साबळे यांनी दिला.जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या रस्त्याची रूंदी ही कमी केल्याने रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात आलेल्या गटारीचे व पेव्हींग ब्लाॅकस चे काम निकृष्ठ व दर्जाहीन झाले असून या कामावर नियंत्रण ठेवणा-या ध्रुव या एजन्सीचे या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आम्ही आज निकृष्ठ व दर्जा हिन  असे सुरू असलेले या मार्गावरील पेव्हींग ब्लाॅकस बसविण्याचे काम बंद पाडले असून हे जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले काम सबंधित कामाचे ठेकेदार यांनी पुन्हा  केल्याशिवाय आम्ही हे काम सुरू करू देणार नाही असा ईशारा साबळे यानी दिला.डाॅ. आरळी हाॅस्पीटल ते छत्रपती संभाजी महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,पोलीस स्टेशन या रस्त्यावर त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज चौक ते शहीद सोलनकर चौक( शेगाव काॅर्नर) या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले रस्ते सबंधित यंत्रणेणे त्वरीत दुरूस्त करावेत अशी आमची मागणी आहे. विजापूर- गुहागर हा जत शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गकडेची अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विनोद कांबळे, सुभाष कांबळे, प्रशांत ऐदाळे, राहुल चंदनशिवे,प्रा.हेमंत चौगुले,किशोर चव्हाण, सोमनाथ कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

  

जत शहरातील संभाजी चौक ते‌ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यतच्या रस्त्यावर रिपाइंने प्रशासनाचा निशेष करत वृक्षारोपण केले.