दुष्काळमुक्तीला चेकडॅम ठरणार वरदान ; आ.विक्रमसिंह सावंत | मुचंडी,सिध्दनाथ,पांढरेवाडी,संख येथे भूमिपूजन

जत,संकेत टाइम्स : जत तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने येथे पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब अडविले पाहीजे.यासाठी जलसंधारणाला अधिक महत्व द्यावे लागेल,तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत,त्याच सोबत जलसंधारणाच्या कामालाही आपण प्राधान्य दिले आहे,आज जत पूर्व भागात होत असलेल्या नऊ चेकडममुळे दुष्काळ मुक्तीला साथ मिळणार आहे,असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. 
जत तालुक्यात मृद व जलसंधारण विभागा मार्फत मंजूर झालेल्या नऊ चेकडमचे उद्घाटन आमदार सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.


यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार कार्याध्यक्ष सुजय शिंदे , जि.प.सदस्य सरदार पाटील , नगरसेवक भूपेन्द्र कांबळे,माजी सभापती बाबासाहेब कोडग, मारुती पवार, प्रकाश पांढरे,एम. आर.जिगजेणी,साहेबगौड़ा पाटील,यामंतराव बिराजदार,जालिंदर व्हनमाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी विनायक खरात ,उपविभागीय जलसंधारण अधिकारी जगधिश मेटकरी ,शाखा अभियंता जलसंधारण विभाग शरद सुतार आदी उपस्थित होते.

आ.सावंत पुढे म्हणाले,जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा शब्द आपण निवडणुकीत दिला आहे. त्याची फलश्रुती आपणाला दिसते आहे.आज म्हैसाळ योजनेला दोन वर्षात मोठ्या प्रमाणात गती दिली.त्यामुळे इकडे उमदी पर्यंत पाणी आले आहे .आवंढी तसेच देवनाळ भागातही पाणी पोहचले आहे. येणाऱ्या आवर्तना पर्यंत म्हैसाळ योजना शंभर टक्के कार्यन्वीत करण्याचे नियोजन केले आहे, यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील , कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनीही मोठे सहकार्य केले आहे . 
दरम्यान, तालुकयाच्या पूर्व भागातील वंचित गावांसाठी आपण तुबची योजनेतून पाणी देण्याची मागणी महाराष्ट्र कर्नाटक सरकारकडे केली आहे . कर्नाटक देखील सकारात्मक आहे . तसेच राज्य शासन विस्तारीत योजना करणार आहे. कोणत्या का असेना पण जतला पाणी मिळावे या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून ,यात कुठेही कमी पडणार नाही. एकीकडे जतच्या सिंचनाचा विषय गंभीर असल्याने मी सातत्याने संघर्ष करत आहे . परंतु आजही विरोधक शांत बसायला तयार नाहीत. चांगल्या कामाला खो घालायचा . चुकीचा संदेश लोकांत पसरवायचा हा उद्योग सरू आहे.


विरोधकांना काही करायचे नसेल तर किमान चांगल्या कामाला विरोध करू नये अशी भूमिका आम्ही सतत मांडत आलो आहोत.त्यामुळे सतत त्यांच्या टीकेला , चुकीच्या आरोपांना उत्तर देण्यात रस वाटत नाही. जत तालुक्यातील जनतेला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे. एकीकडे कोरानामुळे सबंध राज्य अडचणी असतानासुध्दा जतच्या विकासाला चांगली गती देण्याचे काम सुरू आहे ,असेही आ. सावंत यांनी स्पष्ट केले . 
चेकडॅम ठरणार वरदान
आ .सावंत म्हणाले , आज मुचंडी येथे सहा तर सिध्दनाथ , संख , पांढरेवाडी येथे चेकडैम मंजूर केले आहेत.मुचंडी भागातील डॅममुळे 514.57 सघमी पाणीसाठी उपलब्ध होणार असून ,182 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या कामावर 714.10 कोटी रुपये खर्ची होणार आहेत. तसेच संख नाटेकरवस्ती येथे 115.50 कोटी,पांढरेवाडी लेंगरेवस्ती येथे 110.59 कोटी रूपये , सिद्धनाथ बिदरीवस्ती येथे 97.95 लाख रूपये खर्च करून हे बंधारे होत आहेत .असे एकूण 1038.14 कोटी एतका निधी दुष्काळ मुक्तीसाठी आला आहे.या बंधाऱ्यांचा फायदा लगतच्या‌ शेतकऱ्यांना होणार आहे.मुचंडी येथील चेकडँमचे भूमिपुजन करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर