संखला तहसीलदारांची नेमणूक करावी

जत,संकेत टाइम्स : संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे लाचलुचपतच्या‌ जाळ्यात अडकल्याने रिक्त झालेल्या संख अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त आहे.त्यामुळे विविध कामे करताना मोठ्या अडचणीचा सामना शेतकरी,नागरिकांना करावा लागत आहे.सध्या संखचे‌ रिक्त तहसीलदार पदाचे अतिरिक्त कार्यभार प्रभारीवर आहे.त्यामुळे अनेक कामे रखडली आहेत.दाखले,शेतीच्या तक्रारी,आदि कामे खोळबंली आहेत.शिवाय तहसीलदार नसल्याने वाळू तस्करी बेफामपणे सुरू आहे.त्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे.त्यामुळे तातडीने तहसीलदारांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.