जतमध्ये‌ सव्वा आठ लाखाचा गुटखा जप्त | पुन्हा तस्करी उघड ; बिळूरच्या एकजणाला अटक

जत,संकेत टाइम्स : सीमावर्ती कर्नाटकातून महाराष्ट्रात‌ करोडो रूपयाचा गुटखा तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून जत पोलीसांच्या नाईट राऊडच्या पथकाने तब्बल पाच लाख‌‌ वीस हजाराचा गुटख्यासह एक झायलो चारचाकी वाहन जप्त केले आहे.याप्रकरणी बिळूर ता.जत येथील सोहेल राजेसाब मंगळवेडे याला ताब्यात घेतले आहे.
जत तालुक्यात बेकायदा गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.कोरोना निर्बंधात अशा दुप्पट दराने गुटख्याची तूफान विक्री गावागावात होत आहे. यामुळे अनेकांना कर्क रोगांच्या समीप नेहले आहेच,त्याशिवाय यात‌ तरूण पिडी बरबाद होत आहे.


जत तालुक्याला लागून असलेल्या कर्नाटकात या गुटख्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विक्री कोरोडोचा नफा कमवत आहे.यावर कारवाई करण्याची जबाबदारी असणारा अन्नभेसळ विभाग कोमात गेला असून अपुरी कर्मचारी असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.परिणामी गुटखा विक्री गावागावत वाढली आहे.


विशेष म्हणजे पाच रूपयाची गुटखा पुडी दुप्पट दराने दहा रूपयाला विक्री होत आहे.सीमावर्ती लगतच्या गावातून असा गुटखा दिवसाढवळ्या जत तालुक्यासह सांगोला,मंगळवेढा तालुक्यात येत आहे. याला पोलीसाचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे.
बुधवारी रात्री असाच कर्नाटकातून महिंद्रा झायलो गाडी (क्र.एमएच‌ 10,बीएम 3042) यात भरून संशयित चालक सोहेल राजेसाब मंगळवेडे रा.बिळूर हा विविध कंपन्याचा गुटखा भरलेली पोती घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कडे
जात होता.


या गाडीचा संशय जत पोलीसांच्या नाईट राऊंडच्या पथकाला आल्याने त्यांनी त्याला अडवत पाहणी केली असता,गाडीत विविध गुटख्याच्या पुड्या असलेली सुमारे पन्नास पोती आढळून आली.वाहनासह गुटखा जप्त‌ करत पोलीसांनी अन्नभेसळ विभागाच्या सहकार्याने पंचनामा केला.यात तब्बल 4 लाख‌ 20 हजार रूपयाचा विविध कंपन्याचा गुटखा आढळून आला आहे. पोलीसांनी 4 लाखाची झायलो गाडी असा 8 लाख 20 हजाराचा‌ मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनाचा चालक सोहेल राजेसाब मंगळवेडे याला ताब्यात घेतले आहे.


जत येथे‌ पोलीसांच्या पथकाने पकडलेला गुटखा