माजी आमदार उमाजीराव सनमडीकर अंनतात विलीन

जत,संकेत टाइम्स : जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या पार्थिवावर सायकांळी 7.00 वाजता सनमडी येथे शासकीय इतममात अंत्यसंस्कार करण्यात आले.जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रंध्दाजली वाहिली.त्याचे चिंरजीव डॉ.कैलास सनमडीकर यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला.त्यावेळी उपस्थित सर्वजण गहिरवले.


माजी सैनिक ते 15 वर्षे आमदार राहिलेले उमाजीराव सनमडीकर यांच्या अत्यंसंस्कार मोठ्या संख्येने त्यांना माननारे अनेक स्तरातील मान्यवर,नेते,नागरिक उपस्थित होते.
सनमडी या त्यांच्या मुळे गावी त्यांचे पार्थिव काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आले, त्यांनतर त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या मागे पत्नी कमल सनमडीकर,मुलगा डॉ.कैलास सनमडीकर,सून डॉ.वैशाली सनमडीकर,मुलगी नुतन गायकवाड,सुनिता मधाळे,नात अपुर्वा सनमडीकर,नातू अनुष्क सनमडीकर असा परिवार आहे.