दैनिक संकेत ‌टाइम्सचे‌ संपादक राजू माळी यांना पितृशोक

जत,प्रतिनिधी : बेंळूखी (ता.जत) येथील तुकाराम रामू माळी-कोरे यांचे शुक्रवारी पहाटे दु:खद निधन झाले, मुत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षे होते.
दैनिक संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी यांचे ते वडिल होत.काही काळ पैलवान म्हणून ते परिचित होते.गरिब परिस्थितीतून मोठे कष्ट करत त्यांनी कुंटुबाचा गाडा हाकला होता.संकेत टाइम्सच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते
शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,नातवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी 8.00 वाजता‌ आहे.