दोन दिवसानंतर जतला लस | लसीकरण केंद्रांवर सकाळपासून रांग ; नागरिकांचा संताप

जत,संकेत टाइम्स : दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरूवारी जतमध्ये कोरोना लस उपलब्ध झाली.लस घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टसिंग, कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र जत शहरातील एकमेव असलेल्या सेंटरवर दिसून आले.उपस्थित पोलीसही संतापलेल्या नागरिकांना रोकण्यात हातबल झाले होते.
   

जत शहरासह तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या ही आटोक्यात येऊ लागली असतानाच आता प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार समोर येत आहेत,यामुळे कोरोनाला एक प्रकारे आमंत्रण दिल्याचा हा प्रकार होता.
जत येथिल ग्रामीण रूग्णालयासमोरील स्व.श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे संकुलात जत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना लसीकरण सेंटर सुरू आहे.


येथे वरिष्ठ अधिकारी फिरकत नाहीत,शिवाय लस कधी येणार आहे, किती आल्यात,किंबहुना किती दिवस सेंटर बंद राहणार आहे.यांची कोणत्याही सुचना सेंटर बाहेर लावल्या जात नाहीत.त्यामुळे नागरिक अनेक वेळा हेलपाटे घालतात.मंगळवार,बुधवार या दोन दिवसाच्या खंडानंतर गुरूवारी जत सेंटरवर लस आली.खरी मात्र सकाळी सात वाजलेपासून लस घेण्यासाठी सुमारे पाचशेवर नागरिकांची गर्दी केंद्राबाहेर होती.लस दुपारी दोनच्या सुमारास आली आणि एकच कल्लोळ उडाला.केंद्राच्या आतामध्ये एकदम एवढे नागरिक एकाचवेळी लस घेण्यासाठी गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला.पोलीसांनाही प्राचारण करण्यात आले, मात्र अनेक तास ताटकळत बसलेले नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.


नागरिकांच्या होणाऱ्या बेहाल जिल्हा,तालुक्यातील यंत्रणाना कधी गांर्भिर्य वाटणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

जत शहरातील लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी धोका वाढवणारी ठरत आहे.