मोहन माळी इंटरनँशनल स्कूल शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल ; रोहित पाटील

कवटेमहांकाळ : अलकूड येथील मोहन माळी इंटरनँशनल स्कूल ग्रामीण भागातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरले असून अत्याधुनिकेतची कास धरलेल्या या स्कूलमुळे सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधां मिळत आहेत,असे उद्गार युवा नेते रोहित आरआर पाटील यांनी काढले.ते मोहन माळी इंटरनँशनल स्कूलच्या शैक्षणिक वर्षे 2020-21 मधील इ.10 वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रंसगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन मोहन माळी,सचिव सौ.नेहा मोहन माळी 
उपस्थित होते. यावेळी रोहित पाटील यांच्याहस्ते इ.10 वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
रोहित पाटील पुढे म्हणाले,ग्रामीण भागात उच्च प्रतीचे ,अद्यावत सुविधेसह उत्तम शिक्षण देत असून - संस्थेने IIT- MEDICAL ACADEMY ची स्थापना करून आपल्या सभोवतालच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना JEE-NEET-CET सारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून 12 वी नंतर डॉक्टर - इंजिनिअर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून दिलेली आहे,पूर्वी ज्या शिक्षणासाठी कोल्हापूर - सांगली -पुणे येथे शिक्षणासाठी जावे लागत होते,तेच शिक्षण अगदी माफक फी मध्ये इथे उपलब्ध केले आहे.
मोहन माळी इंटरनँशनल स्कूल ही संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये नवी क्रांती आणेल असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला.मोहन माळी यांनी संस्थेविषयी माहिती देत भविष्यातील संस्थेचे नियोजन इंजिनिअरिंग व मेडिकलचे मोठे संकुल उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
संस्था कार्याचा अहवाल विषयी श्री. सचिन कदम,एस.पी.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्र संचालन पी.जे.कलमडे यांनी केले तर सौ.लीना वसमाळे यांनी आभार मानले, यावेळी संस्थेतील शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोहन माळी इंटरनँशनल स्कूल मधील दहावीतील यशस्वी विद्यार्थ्याचे रोहित पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले.