जत‌ शहरात वाहतूक कोंडी | नगरपरिषदेचे नियोजन शून्य ; पोलीसाची कारवाई थंडावली

0



जत,संकेत टाइम्स : जत पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शहरात वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीमुळेच कोरोनाचा प्रसार.जिल्हापोलीस प्रमुखानी लक्ष देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होत आहे.

जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.रामदास शेळके यानी जत शहरातील वाहतूक सुरळीत केली होती.कोरोनाचे पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शेळके यानी शहरातील जयहिंद चौक, मटन मार्केट, सांगली अर्बन को ऑप.बँक समोरील रस्त्याचे कडेला बसणारे भाजीपाला विक्रेत्याना जत वाचनालयाजवळील थोरल्या वेशीत बसण्यासाठी नियोजन केले होते. 






याठिकाणी बाजार स्थलांतरीत झाल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी कमी झाली होती.व वाहतूकही सुरळीत सुरु होती.कोणतेही प्रकारे वाहतुकीची कोंडी होत नव्हती. 

परंतु जतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. शेळके यांची बदली झाल्याने परत शहरातील वाहतूक कोंडी परत होऊ लागल्याचे चित्र जागोजागी दिसून येत असून पोलीस निरीक्षक शेळके यानी सुरू केलेला थोरल्या वेशीतील भाजीपाला आता पुन्हा जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत जयहिंद चौक ते मटन मार्केट, सांगली अर्बन बॅकेसमोर भरू लागल्याने परत मोठी वाहतूककोंडी होताना दिसत आहे.





शहरातील बनाळी चौक याठिकाणी तर फळविक्रेते, तसेच ईतर व्यवसाईक हे आपले व्यवसाय करित असल्याने ग्राहक ही आपली दोनचाकी व चारचाकी वाहने रस्त्याचे दोन्ही बाजूला लावून बाजार करण्यासाठी फिरत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. 

जत शहरातील रस्त्याचे दोन्ही बाजूला बसून व्यवसाय करणारे भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्यावर हातगाडी लावून फळे विक्री करणारे फळविक्रेते यांना जत नगरपरिषदेने कायमस्वरूपी अशी जागा नेमून द्यावी व हे व्यवसाईक नगरपरिषदेने नेमून दिलेल्या जागेवरच आपले व्यवसाय सुरू करतात की नाही याकडे जत नगरपरिषदेने वरचेवर लक्ष दिले तर जत शहरात होणारी ही वाहतूक कोंडी दूर करता येईल. 

Rate Card






यासाठी पोलीस प्रशासनाने जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत जे हातगाडीवाले रस्त्यावर हातगाडे लावून वाहतुकीची कोंडी करतात अशा फळविक्रेते यांच्यावर तसेच रस्त्याचे दोन्ही बाजूला बसून जे भाजीपाला विकून वाहतुकीची कोंडी करतात अशा भाजीपाला विक्रेते यांच्यावर व रस्त्यावर ठिकठिकाणी जे वाहनधारक आपली दोनचाकी व चारचाकी वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात अशावर दंडात्मक कारवाई करावी.

त्याच प्रमाणे जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत वारंवार वाहतूककोंडी होऊ नये यासाठी जिल्हापोलीस प्रमुख श्री. दिक्षीत गेडामसाहेब यांनी जत बाजारपेठेत कायमस्वरुपी दोन वाहतूक पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.





जत‌ शहरातील मुख्य बाजार पेठेत पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.