जतेत पुन्हा कोरोना रुग्णाचा आकडा वाढला,दोघाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा पन्नासी कड़े गेला असून तालुक्यात शनिवारी 47 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर पुन्हा दोघाचा मुत्यू झालेल्याने धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.सध्या तालुक्यात 450 रुग्ण उपचाराखाली आहेत तर शनिवारी
30 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

शनिवारी माडग्याळ 10,बेवनूर 6,कोसारी 5,वाळेखिंडी 5,उमदी 4,बिळूर 4 या गावात वाढलेले रुग्ण चिंता वाढविणारे ठरत आहेत.
जत 4,वळसंग 1,रामपूर 1,डफळापूर 1,कुणीकोणूर 1,शेगाव 1,धावडवाडी 1,संख 1,दरिकोणूर 1,खंडनाळ 1 असे 47 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आठ दिवसात प्रथमच एकदम रुग्ण वाढले आहेत.