एकुंडीला नावललौकिक मिळवून देणारे संरपच ; बसवराज पाटील

ऐतिहासिक राजनैतिक वारसा पुढे नेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवणारे एकूंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय बसवराज पाटील यांचा आज वाढदिवस,त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभो....हीच ईश्रचरणी प्रार्थना.....
आयुष्यात असणाऱ्या अनेक अडचणींना,आव्हानांना सामोरे जात ज्यांनी स्वतःच्या नेतृत्व,आणि बुद्धीच्या जोरावर एकुंडी गावच्या अनेक बेघर कुटुंबांना घर मिळवून दिले,पूर्वीपासून असणाऱ्या अनेक रस्त्यांना नवीन रूप दिलं,ज्या शासकीय योजना गावापर्यंत कधीच आल्या नव्हत्या,त्या योजना बसवराज पाटील यांनी गावापर्यंत आणल्या,शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले,मागच्या पंचवीस वर्षांत जे काम झालं नाही ते काम त्यांनी तीन वर्षांच्या कारकिर्दीत केले.
जे एकुंडी गाव आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक तथा शैक्षणिक क्षेत्रात मागासले होते,अशा वेळेस वाळवंटात जशी गंगोत्री यावी अशा रूपात त्या गावाला बसवराज पाटील यांचं नेतृत्व लाभलं, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सहयोगाने आपल्या गावासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिली.ज्या गावाला स्वतःची कोणतीच ओळख नव्हती अशा गावाला त्यांनी तालुकास्तरावर नाव कमवून दिले.
     
 बसवराज पाटील हे आपल्या जत तालुक्याला लाभलेले एक अमूल्य नेतृत्व आहे..जे गोरगरिबांच्या हक्कासाठी नेहमी पुढं होऊन काम करतात.अगदी शांत स्वभाव,प्रत्येक आर्थिक राजनैतिक बाबींचा अभ्यास असणारे,स्पष्ट आणि कणखर वक्तृत्व तसेच निरपक्ष होऊन निर्णय घेणारे एक युवा नेते ज्यांनी  स्वतःची संघटना स्थापन करून लिंगायत धर्म आणि त्यांच्या हक्कासाठी संघटित होऊन काम केले....
     
त्यांच्या निर्भिड,आणि न्यायिक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना भाजपा जत तालुका युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली...
    बसवराज पाटील यांच्या रूपात आपल्या जत तालुक्याला एक अष्टपैलू,निर्भिड व्यक्तिमत्त्व लाभलं आहे.त्यांच्या पुढील कारकिर्दीस आकाशाएवढे उंच यशोशिखर मिळो,त्यांच्या विचारांना भाग्याची जोड मिळो,इथून पुढच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा..


शंब्दाकन ; प्रियांका मगदूम