मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळात भूमिका मांडावी | आ.विक्रमसिंह सांवत यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

जत,संकेत टाइम्स : संभाजी ब्रिगेड मराठा ओबीसी करणाचा लढा गेल्या तीस वर्षापासून लढत आहे.त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर, यांच्या आदेशानुसार जत आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देत‌ मागण्या‌‌ सरकार दरबारी मांडाव्यात असे साकडे घालण्यात आले.


मराठा समाजाचे ओबीसी करण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण,सुप्रीम कोर्टाच्या निकाला पूर्वीच्या मराठा समाजातील नौकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात,मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.
या सर्व मागण्यांसह मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलणे आवश्यक आहे.मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मराठा समाजातील नोकरीस पात्र 2185 उमेदवारांना नियुक्त्या रखडलेल्या आहेत. हा तरुणांचा प्रश्न आहे. आपण एक आमदार आहात या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण तरुणांचे प्रश्न सोडवाल ही अपेक्षा आहे. 


तरी वरील विषय आपण समजून घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी. जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक ,जत तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण ,बेवनूरचे उपसरपंच विजयकुमार नाईक, दिपक पाटणकर, शहराध्यक्ष प्रमोद काटे, तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे ,संदिप नाईक, मल्लिकार्जुन कोळी,इर्शाद तांबोळी,वैभव पवार,आकाश कदम,युवराज कोडग‌ आदी उपस्थित होते.


मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळात भूमिका मांडावी,संभाजी ब्रिगेडकडून आ.विक्रमसिंह सांवत यांना निवेदन देण्यात आले.