पंचायत समितीचे अधिकारी बेलगाम | कधीपण या,कधीपण जावा ; तक्रारीवर कारवाईपेक्षा तडजोडीकडे‌ लक्ष

जत,संकेत टाइम्स : जत पंचायत‌ समितीचे अधिकारी,कर्मचारी बेलगाम बनले असून सामान्य जनतेला यांचा फटका बसत आहेत.जत तालुक्यात आलेले अनेक घरकूलासह अनेक योजना परत‌ जाण्याची वेळ आली तरी अधिकारी हालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने कार्यालयात या कधीही जावा अशी स्थिती असून शुक्रवारी सायकांळी चारच्या दरम्यान अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी गायब झाल्याचे दिसून आले.उपलब्ध कर्मचाऱ्यांना ते कुठे गेलेत यांची व्यवस्थित माहितीही सांगता आली नाही.विशेष म्हणजे त्यांच्याकडे आलेले काही नागरिक तब्बल तासभर ताटकळत बसल्याचे दिसत होते.