मोहन माळी 'मेस्टा' संघटनेचे जिल्हाध्यक्ष

कवटेमहांकाळ : कवटेमहांकाळ येथील अभिनव फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन माळी इंटरनँशनल स्कूलचे सर्वेसर्वा मोहन माळी यांची 'महाराष्ट्र इंग्लिश मिडियम स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)च्या‌ सांगली जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
कवटेमहांकाळ येथे झालेल्या मेस्टा च्या‌ पदाधिकारी‌ बैठकीत संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे(पाटील) यांनी याबाबत घोषणा केली.तसेच भागिरथीबाई इंग्लिश मिडियम स्कूल शिरढोणचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांची विभागीय संघटक पदी निवड करण्यात आली. दोघांना निवडीची पत्रे देण्यात आली.


मोहन माळी म्हणाले,जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर होत असलेल्या अन्यया विरुध आवाज उठवू व मेस्टा ची सांगली जिल्ह्यातील संघटना मोठ्या ताकतीने बळकट करू असे आश्वासन दिले.यावेळी मेस्टाचे कोषाध्यक्ष  मनीष पांडे,शंकर चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.


कवटेमहांकाळ येथील मोहन माळी यांची मेस्टा संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र देताना मान्यवर