जत‌ शहरातील रस्ते पाण्याखाली

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील गटारी कचऱ्यांने भरल्याने अनेक गटारीचे प्रवाह तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते.गेल्या दोन दिवसात शहरात पावसाने दमदार सुरूवात केल्याने अनेक भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.नगरपरिषदेचे पदाधिकारी मोठ मोठ्या वल्गना करतात.मात्र गटारी,रस्त्याच्या दुरावस्थेकडे त्यांचे होणारे दुर्लक्ष त्यांची शहराविषयीचे प्रेम पुतणा मावशीचे असल्याचे वारवांर स्पष्ट होत आहे.

जत शहरातील थेट रस्त्यावरून नाला वाहत आहेत.