दरिकोणूरमध्ये जून्या भांडणातून दोघास मारहाण

जत,संकेत टाइम्स : दरिकोणूर ता. जत येथे जून्या भांडणाच्या कारणावरून झोपलेल्या स्थितीतील दोघांना मारहाण केल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल केला आहे.
यात,सोमाण्णा व्हनमाने,त्याचा‌ नातू प्रथमेश हे जखमी झाले आहेत.


अधिक माहिती अशी, सोमाण्णा व्हनमाने हे रात्री झोपले असताना संशयित बिराप्पा तम्माण्णा व्हनमाने,बबन बिराप्पा व्हनमाने रा.दरिकोणूर यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली,त्यात सोडविण्यासाठी आलेला नातू प्रथमेस यालाही संशयितांनी मारहाण केली आहे.
याप्रकरणी सुशिला सोमाण्णा व्हनमाने यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.