जतमध्ये आ.गोपीचंद पडळकर हल्ल्याचा भाजपाकडून निषेध

जत,संकेत टाइम्स : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जतेत निषेध करण्यात आला.हल्लेखोरावर कारवाई करावी,या मागणीचे निवेदन तहसिलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. 
सोलापूर येथील घोंगडी बैठकीचे आयोजनार्थ जात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी आमदार पडळकर यांच्या ताफ्यातील ते स्वतः बसलेल्या गाडीच्या काचेवरती मोठासा दगड मारून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला होता.या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या 144 कलमांचे पालन करून, सामाजिक अंतर ठेवत निषेध व्यक्त केला.


हल्ला केलेल्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी,अँड.एन.डी.गडदे,भाऊसो  दुधाळ,बाळासो पांढरे, अनिल पाटील, संजय पाटील उपस्थित होते.


जत येथे आ.गोपिचंद पडळकर यांच्या हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले.