शेगाव नजिकच्या अपघातात वाळेखिंडीचा एकजण ठार

जत,संकेत टाइम्स : शेगाव ता.जत येथे अचानक ब्रेक दाबून चारचाकी थांबविल्याने पाठीमागील दुचाकी या वाहनावर आदळल्याने झालेल्या अपघातात संभाजी पांडुरंग शिंदे (वय 35 रा.वाळेखिंडी) यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.


याप्रकरणी चारचाकी वाहन चालक अनिल पांडुरंग साळे (रा.निगडी कार्नर जत) यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी,संभाजी शिंदे व विक्रम भिमराव शिंदे दोघे रा.वाळेखिंडी हे मोटारसायकल (एमएच 10,डी एफ 2111) वरून वाळेखिंडीकडे जात असताना शेगाव ते वाळेखिंडी रोडवर सिध्दीविनायक मंदिराजवळ संशयित अनिल साळे हा चारचाकी गाडी( नं.एम एच 50,सी 3570)भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन अचानक गाडी थांबविल्याने दुचाकी स्वार दोघे गाडीवर पाठीमागून आदळले.

त्यात संभाजी शिंदे यांचे डोके रोडवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्याने जागेवर मत झाला आहे. तर विक्रम शिंदे जखमी झाला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ धनाजी शिंदे यानी जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी बेजबाबदार पणे गाडी चालवून अपघात घडविल्या प्रकरणी अनिल साळे यांच्यावर भादविसं कलम 279,304(अ)337,427 एम व्ही अँक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.