विषारी औषध पिऊन एकाची आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील वासुदेव ज्योतिराम आगतराव (वय 56,रा.उमराणी रोड,जत) यांनी विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली.घटना बुधवारी पहाटे 10 वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, वासुदेव आगतराव यांनी बुधवारी रात्री 10 च्या सुमारास क्लोफायर्स फओच हे विषारी औषध प्रशान केले.दरम्यान त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या‌ पत्नी आशाराणी अगतराव यांनी त्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उपचारार्थ दाखल केले होते.उपचार सुरू असताना त्यांचा मुत्यू झाला.डॉ.हुबाले यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.