कॉग्रेसशी एकनिष्ठ असलेला मोठा नेता हरपला ; आ.विक्रमसिंह सांवत

माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या निधनामुळे शांत, संयमी पण सामान्यांच्या प्रश्नांसाठी कणखर भूमिका घेणारा एक उमदा मार्गदर्शक गमावला आहे.कॉग्रेसशी एकनिष्ठ माझ्या राजकीय वाटचालीत‌ कायम मार्गदर्शक राहिलेले सनमडीकर काका यांचे आकस्मिक निधन मनाला चटका लावून गेले आहे. जत तालुक्यात तील अनेक लोकाभिमुख कामांसाठी त्यांनी तीनवेळा विधानसभा सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अवेळी जाण्यामुळे सनमडीकर कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तो सहन करण्याची त्यांना ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

- आमदार विक्रमसिंह सांवत,जत