अटल भूजल योजना चित्ररथाचे जत तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत

सांगली : अटल भूजल योजनेबाबत लोकजागृती व्हावी याकरिता राज्यभर चित्ररथाचे संचलन करण्यात येत आहे.   दिनांक 10 जुलै रोजी सांगली जिल्ह्यामध्ये या चित्ररथाचे आगमन झाले आहे. दिनांक 13 जुलै रोजी जत तहसिल कार्यालय येथे या चित्ररथाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

            
या कार्यक्रमास पंचायत समिती जत अधीक्षक प्रशांत हर्षद, मंडळ अधिकारी संदीप मोरे, प्रमोद महाजन, विवेक नवाळे, विठ्ठल पाटील तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सांगली कार्यालयाचे अधिनाथ फाकटकर, विकास पाटील, मुकुंद पाटील आदि उपस्थित होते. 

महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या अटल भूजल या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथाच्या संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना ही राज्यातील तेरा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील भूजल पातळीत सातत्याने घट होत चाललेल्या खानापूर, कवठेमहांकाळ,  जत, तासगाव या तालुक्यांतील एकूण 92 गावांचा समावेश आहे. त्यापैकी 22 गावे जत तालुक्यातील आहेत.

            या योजनेचा हा सुरुवातीचा टप्पा असून येथून पुढे लोकसहभागातून भूजल साठ्यात शाश्वतता निर्माण करणे, भूजल पुनर्भरण कार्यक्रम राबविणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

 
जत : अटलv भूजल योजना चित्ररथाचे जत तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.