मामाने केला भाच्याचा खून मुलीला पळवून नेहल्याने केला गेम ; तिघांना अटक

जत,संकेत टाइम्स : खिलारवाडी (ता. जत) येथील भाच्याने मुलगी पळवून नेहल्याचा राग मनात धरून 
मामाने तीन साथीदारासह अपहरण करून कर्नाटकात नेहत डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडीस आली आहे.जत पोलीसांनी चार दिवस कसून तपास करत संशयित मामासह तिघांना अटक केली आहे.फरार एकजणचा शोध‌ सुरू आहे. 
नाना शिवाजी लोखंडे (वय 27, रा. खिलारवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अर्जुन महादेव शिंदे (वय 40,रा. अभिनंदन कॉलनी सांगली) जगन्नाथ बाळासो लोखंडे (वय 23, रा. खिलारवाडी) विनायक बाळासाहेब
शिंगाडे (वय 21, रा.सुभाषनगर ता. मिरज) या तिघांना अटक केली आहे. यातील अन्य एक संशयित रावसाहेब लक्ष्मण लोखंडे (रा. सुभाषनगर) हा फरार आहे.
संशयिताने नाना लोंखडे‌ या तरूणास चारचाकी गाडी घालून खिलारवाडी येथून अपहरण करून (तोरवी ता. विजापूर) हद्दीत तिकोटा ते विजापूर जवळील नेटीकट्टी ओढ्याच्या पुलाजवळ डोक्यात दगड घालून खून केला होता.जत‌ पोलीसांनी अनुभव पणास लावत अत्यंत गुंतागुंतीचा व क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,खिलारवाडी येथील नाना शिवाजी लोखंडे याला चार मामा
होते.यातील एका मामाने नानाला सेंट्रींग कामावर देखरेख करण्यासाठी सांगलीला नेले होते.नानाचे लग्न 4 वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीशी लावून दिले होते.मयत नानाचे आपल्या सर्व मामाशी घरगुती संबंध होते.यातील एका मामाच्या मुलीला कॉलेजला ने-आण करत होता.याचा गैरफायदा घेत नानाने 1 वर्षापूर्वी अर्जुन महादेव शिंदे या मामाच्या मुलीस पळवून नेले होते.
त्यानंतर दोघांनाही घरी आणण्यात आले होते.या कृत्याबद्दल नानाला मारहाण केली होती व सांगलीतून हाकलून दिले होते.आपल्या मूळगावी खिलारवाडी येथे नाना राहायला आला होता. तरीही नाना संबंधित मुलीला व्हाट्सअप वरून चॅटिंग व फोन कॉल करत होता. ही माहिती अर्जुन शिंदे या मामाला समजली होती. 


या कारणावरून दोघात फोनवरून बाचाबाची झाली होती एकमेकास बघून घेण्याची धमकी देखील दिली होती. मंगळवार दि.22 रोजी रात्री खिलारवाडी येथून आठ वाजण्याच्या सुमारास नानाला चार चाकी गाडीत घालून अपहरण करण्यात आले
होते. याबाबत मयत नानाचा भाऊ धानु शिवाजी लोखडे यांनी भावाचे अज्ञात
व्यक्तीने अपहरण केल्याबाबत जत पोलिसात तक्रारही दिली होती.

पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने
तपासासाठी पथके रवाना केली. आरोपींनी कोणताही पुरावा न ठेवल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मयत नाना लोखंडे यांचे मोबाइल लोकेशन तपासत पोलीसाचे पथक तोरवी (ता.विजापूर)गावचे हद्दीत पोहचले. विजापूर पासून सहा किलोमीटर अंतरावर
ओढा आहे.तेथे नाना लोखंडेचा मृतदेह मंगळवारी मिळून आला.
पोलिसांनी मयत नानाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.  नानाचे मामाशी वाद झाल्याची पोलीसांनी माहिती मिळाली होती.
या संशयावरून पोलीसांनी मामा ताब्यात घेत कसून चौकशी केली असता,त्यांनी मुलीला पळवून नेहल्याच्या‌ रागातून खून केल्याची कबुली दिली आहे.


सदरचा तपास पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहीते, संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस नाईक बजरंग थोरात, सचिन ढाके,उमर फकीर, अमोल चव्हाण, प्रशांत गुरव, शरद शिंदे यांनी केला आहे.

भाच्याच्या खूनप्रकरणी ताब्यात घेतलेले संशयित