बिळूर परिसरात कन्नड चित्रपटाचे शुटिंग सुरू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात प्रथमच कन्नड आणि मराठी भाषेत चित्रपट तयार होत आहे. 'मरळी मनसागीदे' असे चित्रपटाचे नाव असून त्याचा मुहूर्त बिळूर येथील गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती मृगेंद्र स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्थानिक कलाकारांना घेऊन एक उत्तम चित्रपट तयार करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी बेंगलोरहुन मोठे दिग्गज कलाकारांना बोलावण्यात आले आहे.


यात चित्रपटात अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळणार आहे.
यामध्ये मुख्य भूमिकेत अनिल पाटील दिसणार आहेत तर हिरोईन म्हणून राशी उलवप्पा, डायरेक्टर श्रीशैल टक्कनवर, कॅमेरामन विजयचंद्र, सहकलाकार निमिशा शेट्टी, सहाय्यक दिग्दर्शक अनेश एम, संतोष सुतार, प्रमुख भूमिकेत राजू आरळी,सहकलाकार संजय पाटील,विश्वनाथ साळुंखे, दर्शन बिराजदार,बसवराज,राजू असे कलाकार यात काम करणार आहेत.