सिंदूरमध्ये दारू,करजगीत मटका अड्ड्यावर छापा

जत,संकेत टाइम्स : जत,उमदी पोलीस ठाण्याचा हद्दीत वाढलेल्या अवैध धंद्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी उमदी पोलीसांनी करजगीत मटका अड्ड्यावर तर जत पोलीसांनी सिंदूरमध्ये बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एकास पकडले आहे.संजय गिरमल्ला मदभावी रा.सिंदूर हा अडीच वाजण्याच्या सुमारास जतकडून सिंदूरकडे दुचाकी क्र.केए 22/8638 वरून बेकायदेशीर देशी दारूच्या बॉटल विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलीसांनी बसरगी नजिक त्याला थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडे आयकँप कंपनीच्या 180 मी.च्या 8,640 रूपये किंमतीच्या 114 बॉटल व 50,हजार रूपये किंमतीची होंडा शाईन गाडी जप्त केली.याप्रकरणी गणेश विलास ओलेकर यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान बिंळूर परिसरात बेकायदा दारू, मटका,जूगार,गांज्या,चंदन तस्करी जोरात सुरू असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.परिसरातील बिळूर,बसरगी,सिंदूर,गुगवाड,वज्रवाड ही गावे अवैध धंद्याच्या विळख्यात अडकली आहेत.दरम्यान जत पुर्व भागातील जवळपास सर्व गावांना अवैध धंद्याने पछाडले असून उमदी पोलीस ठाण्याच्या अधिपत्या खालील हा भाग अनेक अवैध धंद्यासाठी पोषक ठरला असून पोलीसाचा कानडोळा याला कारणीभूत आहे.दरम्यान कधीतरी पोलीसाकडून कारवाई होत आहे.
तिंकोडीतील दारू अड्ड्यावरील कारवाई नंतर करजगीतील मटका अड्ड्यावर उमदी पोलीसांनी छापा टाकत जोहर अहमद गुलाब पखाली याला बेकायदा मटका घेताना ताब्यात घेतले आहे. 


त्यांच्याकडे 865 रुपये रोख व मटका घेण्यासाठीचे कागद व पेन जप्त केले आहे. पोलीस नाईक श्रीशैल वळसंग‌ यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान जत तालुक्यात एकीकडे कोरोनाच्या निर्बंधात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असताना दारू,मटका,जुगार सारखे अड्डे बहरले आहेत.डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी सक्रीय होण्याची गरज निर्माण झाली आहे.