आर.डी.शिंदे यांचा सहपत्नी संखमध्ये सत्कार

जत,संकेत टाइम्स : संख (ता.जत)येथील श्री गुरु बसव विद्या मंदिर जुनिअर कॉलेजच्या वतीने 
सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी आर.डी.शिंदे यांचा सहपत्नी माजी सभापती तथा संस्थेचे संस्थापक डॉ.आर.के.पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.त्याशिवाय शाळेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही निरोप देण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण पाटील सर, मुख्याध्यापिका सौ.के.के.पाटील,प्रा. आर.बी.पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ.आर.के.पाटील म्हणाले,तालुक्याला आर.डी.शिंदेच्या रूपाने उत्तम व कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी लाभला होता.तालुक्यात प्रत्येक शाळाच्या अडचणीत,विद्यार्थ्याचे प्रश्न सोडविण्यात शिंदे यांनी शाळांना मोठी मदत केली आहे.


उत्तम प्रशासक म्हणून त्यांची तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला कायम ओळख राहिला.निवृत्तीनंतरही त्यांनी आपला अनुभव शिक्षण क्षेत्रासाठी उपयोगी आणावा.
पी.व्ही.कठारे यांनी सूत्रसंचालन,एम.जे.रानगर यांनी आभार मानले.ए बी कर्डी यांनी पुस्तक प्रकाशनाचे माहिती दिली. 
यावेळी शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. संख‌ येथे आर.डी.शिंदे यांचा सहपत्नी संखमध्ये सत्कार करताना माजी सभापती आर.के.पाटील,मुख्याधिपिका के.ते.पाटील