महावितरणकडून सक्तीने बिल वसूली | अन्याय थांबवा,अन्यथा कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर घेऊ ; तुकाराम बाबा

जत,संकेत टाइम्स : एकाबाजूला कोरोनाने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना दुसऱ्या बाजूला महावितरणने वीज बिलाची सक्तीची वसुली चालू केली आहे. वसुलीसाठी ज्यांचा काही संबंध नाही अशा खाजगी लोकांची नियुक्ती करून दमदाटीने वसुली केली जात आहे. कोणतीही सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जात आहेत.

सध्याचा कठीण काळ बघता महावितरणकडून जो मिनिमम चार्ज लावला जातो तो लावू नये. या मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोरच महावितरणचा निषेध नोंदवीत कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा यांनी दिला आहे.


तुकाराम बाबा यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे,रुपेश पिसाळ,विवेक टेंगले,बाळासाहेब मोटे आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे कि,सध्या कोरोनाच्या दोन्ही लाटे‌ तब्बल दीड वर्षाचा काळ अडचणीचा गेला आहे.यात उद्योग,व्यवसाय,शेतमालाला कवडीमोल दर मिळाल्याने सर्वजण अजचणीत आहेत.अशात दुसरी लाट निर्बंध अजून संपलेले नसतानाही महावितरण कडून सक्तीने बिले वसूल केले जात आहे. त्रयस्थ माणसे लावून दमबाजी करून विज कनेक्शन तोडले जात आहे. सध्या परिस्थिती भहवाह आहे.जगनेही मुश्किल झाले असताना शासनाचा विभाग असलेला महावितरण सावत्र पणाची भूमिका घेत आहेत. हे निंदनीय आहे,हा थांबवावा अन्यथा अगळेवेगळे आंदोलन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागे करू असा इशारा दिला आहे.


सक्तीने बिल वसूली थांबवा या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.