जत तालुक्यात पुन्हा दोघाचा मुत्यू,39 नवे रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.प्रशासनाची ढिलाई,बेपर्वार्ह नागरिक यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे.गेल्या चार दिवसापासून सातत्याने नव्या रुग्ण संख्येत वाढत होत आहे.बुधवारी पुन्हा 39 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर दोघाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 515 रुग्ण उपचाराखाली आहेत.
मंगळवारी रुग्ण संख्या 11,448 वर पोहचली असून 10,664 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 269 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.

जत 6,अचनहळ्ळी 2,बिरनाळ 1,काराजनगी 1,देवनाळ 1,करेवाडी को.1,करजगी 2,माडग्याळ 3,कुलाळवाडी 4,शेड्याळ 1,उमराणी 1,साळमळगेवाडी 1,सिंदूर 1,हिवरे 1,वाळेखिंडी 2,शेगाव 1,कुंभारी 1,गुळवंची 4,डोर्ली 1,डफळापूर 2,बेंळूखी 1,खलाटी 1 असे 39 आढळून आले आहेत.