भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दांपत्याला मारहाण

जत,संकेत टाइम्स : कोसारी ता.जत येथे पुतण्या व त्यांच्या पत्नीचे भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या काकाला पुतण्या व त्यांच्या पत्नीने काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.यात भगवान पांडूरंग टेंगले व त्यांच्या पत्नी वजाबाई टेंगले या जखमी झाल्या आहे.घटना गुरूवारी सायकांळी 4 वाजण्याचा सुमारास घडली.अधिक माहिती अशी, कोसारी येथे रामा बाळू टेंगले याना त्यांची पत्नी बालेशा टेंगले या विनाकारण शिवीगाळ करत असताना भगवान टेंगले व त्यांची पत्नी वजाबाई हे विचारत असताना पुतण्या रामा व पत्नी बालेशा यांनी काठीने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जत पोलीसात दाखल झाली आहे.