तीन हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणांची सोय दोनशे जणांना रोजगार दिला

जतचे सलग 15 वर्षे आमदार राहिलेले उमाजीराव सनमडीकर यांनी तालुक्यात उभारलेले सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळच्या माध्यमातीतून सुरू असलेल्या आश्रमशाळा,वस्तीगृह,पॉलिटेक्निक, इंग्लिश मेडियम स्कूल,सारख्या संस्थातून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केलीच शिवाय या संस्थात तालुक्यातील सुमारे दोनशे तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे.

दोनशे शिक्षक,अधिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कुंटुबाला या संस्था आधार ठरल्या आहेत.विशेष म्हणजे काका राजकारण करत असूनही त्यांनी संस्थेतील कोणत्याही शिक्षक,कर्मचाऱ्यांचा राजकारणा साठी वापर केला नाही.आताच्या काळात  शिक्षक,कर्मचाऱ्यांना कुंटुबातील सदस्य माननाऱ्या माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांच्या आकस्मिक निधनाने सिध्दार्थ शिक्षण समुह गहिवरला आहे.अनेक शिक्षकांना काकांनी केलेल्या मदतीच्या अनुभव सांगताना शंब्द‌ उदारता येत नव्हते.सनमडी येथील अत्यसंस्कार क्षणी दोनशे शिक्षकांनी अश्रू आवरत नव्हते.आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आम्ही मुकलो आहोत,अशा प्रतिक्रिया अनेक जेष्ठ शिक्षक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.