स्वार्थी नेत्याच्या एकाधिकारशाही प्रवृत्तीला जतेतच गाडणार ; प्रमोद कोडग,उद्धव शिंदे | शेकडो कार्यकर्त्याचा शिक्षक समितीत जाहीर प्रवेश

0



जत,संकेत टाइम्स : सामान्य कार्यकर्त्यांची घरे जाळून शिक्षक बँकेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या स्वार्थी नेत्याच्या एकाधिकारशाहीला जतेतच गाडणार असल्याचा हल्लाबोल जत तालुका शिक्षक संघ थोरात गटाचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद कोडग व उद्धव शिंदे यांनी केला.





कोडग व शिंदेसह असंख्य कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.कोडग,शिंदे पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपद, जिल्हा शिक्षण कमिटी निमंत्रित सदस्य व शिक्षक बँकेचे संचालक पद स्वतःकडेच ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या जत मधील असंतोषाला वाट मोकळी करून देण्याचे काम आज आम्ही करीत आहोत.






शिक्षक समितीने आपल्या सत्ताकाळात मयत सभासदांसाठी कर्जमाफी योजना,दोन वेळी परत दिलेली कायम ठेव, वेळोवेळी कमी केलेला कर्जाचा व्याजदर,निष्कर्जी व नवी पेन्शन योजना लागू असलेल्या सभासदांसाठी लागू केलेली योजना, कोरोना संकटकाळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करून रुग्णांना दिलेला दिलासा यांसह अनेक सभासद व समाज उपयोगी उपक्रमांमुळे आम्ही प्रभावित झालो असून यापुढच्या काळात शिक्षक समितीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.





शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर म्हणाले, कोणत्याही संघटनेला निश्चित अशी एक विचारधारा, ध्येयधोरणे, कार्यप्रणाली असते. परंतु विरोधकांचा गटापुढे कोणताही विधायक अजेंडा नाही. ती एक लुटारूंची टोळी आहे. त्यांच्या कारनाम्यांमुळे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त बनलेल्या शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका शिक्षक समितीने स्वीकारली आहे.यावेळी शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र नवले, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसन पाटील, सचिव शशिकांत भागवत,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड सरचिटणीस दयानंद मोरे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव, व्हा.चेअरमन राजाराम सावंत, संचालक बाळासाहेब आडके आर.आर. सावंत, माणिक पाटील, सतीश पाटील आदींसह सांगली सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक समितीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Rate Card



जतमधील असंतोषाचा भडका संपूर्ण जिल्ह्यात थोरात गटाला धडकी भरवणारा ठरणार आहे,ही सुरूवात आहे,आगे आगे,देखो होता है क्या..



      – बाबासाहेब लाड

जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती सांगली



थोरात गटाच्या‌ तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्याचा शिक्षक समितीत जाहीर प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.