जत शहरात पुन्हा चिखल

जत,संकेत टाइम्स : जत शहरात सलग दो तीन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा रस्ते चिखलमय झाले आहेत. विस्तारित भागात वाहने जाऊ शकत नाहीत,इतकी दलदल झाली आहे. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.


शहरातील चिखलमय रस्त्याची दर पावसात कायम असते.मात्र नगरपरिषदेकडून रस्ते मजबूत करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.परिणामी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.