शासनाच्या विविध योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ; प्रंशात आवटे

जत,संकेत टाइम्स : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे‌ वळण्याची गरज असून लहरी निर्सगाला समरून शेतीत पिकांची निवड करावी,राज्य शासन शेतीसाठी सातत्याने विविध योजना आणत आहे,त्यांचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी केले. जत कृषी विभागाकडून कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेतील विजेत्यांना छत्री वाटप व सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले.त्याप्रंसगी आवटे  बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, तहसीलदार सचिन पाटील, तालुका कृषी अधिकारी हणमंतराय मेडीदार,गटविकास अधिकारी दिनकर खरात,सहाय्यक गटविकास अधिकारी तुळशीराम संकपाळ राजेंद्र डोळ्ळी व कृषी विभागाचे अधिकारी, कषी सेवक,शेतकरी उपस्थित होते.
तालुकास्तरीय पीकनिहाय स्पर्धेत रब्बी ज्वारी या पिकात प्रथम क्रमांक श्रीमंत शंकर मळगे (जत),द्वितीय क्रमांक बसवंत महादेव गडदे (को. बोबलाद), तृतीय क्रमांक जनार्दन दिगंबर सावंत (बनाळी),हरभरा पीक प्रथम क्रमांक विद्याधर गिरीश किट्टद (जा.बोबलाद),श्रीशैल बसण्णा कलमाडी (जा.बोबलाद) व द्वितीय क्रमांक मधुकर
दादू माळी (कुंभारी) या शेतकऱ्यांचा बक्षिसे सन्मानपत्र देऊन सत्कार झाला. आत्मा योजना अंतर्गत परंपरागत कृषी विकास प्रकल्प योजना सेंद्रिय शेती अंतर्गत 'विकेल ते पिकेल' मोहिमेअंतर्गत शेतकरी भाजी विक्रेत्यांना जंबो छत्र्यांचे वाटप करण्यात आले.जत येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व छत्रीचे वाटप करण्यात आले.