जिल्हा बँकेच्या संख शाखेचे शाखाधिकारी निलबिंत

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील  सोसायटीच्या कर्ज वाटपात‌ नियमबाह्य‌ कर्ज वाटप आढळून आल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून झालेल्या‌ तपासणीत शाखाधिकारी एम.बी.वाली दोषी आढळल्याने त्यांना निलबिंत करण्यात आले आहे.
तालुक्यात सोसायट्याकडून होत असलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप जिल्हा बँकांचे अधिकाऱ्यांच्या मुळे होत असल्याचे अनेकवेळा आरोप होत होते.संख प्रकरणामुळे ते‌ प्रकार चव्हाट्यावर आले आहेत.शासनाच्या नव्या नियमानुसार जिल्हा बँकेकडून सोसायट्या मार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात येत आहेत.जत‌ तालुक्यात यांची संधी मानत बँकाचे काही शाखाधिकाऱ्यांनी नियम, चौकशी,स्थळ पाहणी न करताच अनेक धनदांडग्यांना लाखो रुपयाची कर्जे दिली आहेत.संख सोसायटीत असा प्रकार झाल्याने बँकेकडून चौकशी सुरू होती.त्यात शाखाधिकारी एम.बी.वाली दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.तालुक्यातील अन्य काही शाखाधिकारी रडारवर असून त्याची चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.