निगडी खुर्दमध्ये तरूणाचा खून | चारचाकी,मोबाईल गायब ; काही संशयित ताब्यात

0





जत,संकेत टाइम्स : शेगाव (ता.जत) येथील चपरासवाडीतील तुकाराम शिवाजी ताटे (वय 35) या शिवसेना कार्यकर्त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून प्रकरणातील चारचाकी गाडी,ताटेचा मोबाईलचा अद्याप शोध‌ लागला नसल्याने खून नेमका कोणत्या कारणासाठी व कोणी केला याचा तपास लागलेला नाही.ताटे यांचा दोन  दिवसापुर्वी खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र घटना सोमवारी सायकांळी उघडीस आली होती.ताटे एकटेच निगडी खुर्द येथील शेतजमीन असलेल्या ठिकाणी वा‌स्तव्यास होते,त्यामुळे घटना कळण्यास अवधी लागल्याचे पोलीसांनी सांगितले.






जत पोलीस,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके विविध भागात संशयिताचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी, मुळ शेगाव जवळील असलेले तुकाराम शिवाजी ताटे हे काही काळ मुंबई येथे राहत होते. सध्या ते निगडीखुर्द (ता.जत) येथील निगडी खुर्द ते बनाळी रस्त्यावर सांवत वाडी फाट्या नजिक असलेल्या शेतजमीनीत राहात होते,तसेच त्यांचा टेलर ड्रायव्हरचा व्यवसाय हाेता.शिवसेना कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते.ते विवाहित असून त्यांना दोन मुलेही आहेत.त्या पत्नी त्यांच्यापासून स्वतंत्र राहत होत्या. साेमवारी सायंकाळी शेगाव-निगडीखुर्द रस्त्यावर निगडी हद्दीतील सांवत वाडी फाट्या नजिकच्या त्यांचा घरात मृतदेह आढळून आला.त्यांच्या शरिरावर धारदार हत्याराने अनेक वार करून खून करण्यात आल्याचे‌ स्पष्ट झाले आहे.खून दोन दिवसापुर्वी झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुरळक लोकवस्ती व ताटे‌ एकटेच घरात राहत असल्याने घटना लवकर समजू शकलेली नाही.






दरम्यान जमिन,वर्चस्व वादातून खून झाला असण्याची शक्यता आहे.घटनेचा शोध लावण्याचे मोठे आवाहन पोलीसमोर आहे.काटे याची स्कार्पिओ (एमएच-10,सीए 7691) ही चारचाकी गाडी,मोबाईल गायब आहे.त्यामुळे खून्याना तपासण्यासाठी पोलीसांना कसब पणाला लावावे लागत आहे.पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.परिसरातील रस्त्यावरील पेट्रोल पंप,दुकानातील सीसीटिव्हीचे चित्रण तपासण्यात येत आहे.

याप्रकरणी भाऊ नामदेव शिवाजी ताटे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.



Rate Card




लवकरचं संशयिताच्या मुशक्या आवळू


घटना कळाल्यापासून आमची पथके तपास करत आहेत.मोबाईल,चारचाकी वाहन गायब असल्याने विलंब होत आहे, मात्र लवकरचं संशयिताच्या मुशक्या आवळू,पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांनी सांगितले.




 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.