जत तालुक्यात तिघाचा मुत्यू | पुन्हा नव्या रुग्णाचे अर्धशतक ; तिसरी लाट अटळ

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून दिवसभरात 50 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर तीन रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.28 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 464 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.
तालुक्यात शनिवारी रुग्ण संख्या वाढल्याने धोका पुन्हा वाढला आहे.तालुक्यातील बेपर्वार्ह पणा तिसरी लाट जवळ आणत आहे.गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असणारी आरोग्य,पोलीस,महसूलची यंत्रणा थकली असून गेल्या दोन वर्षापासून तेच अधिकारी,कर्मचारी कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी राबत आहेत.एकीकडे संक्रमण रोकण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे वैतागलेले व्यापारी,नागरिक आता थांबणे शक्य‌ नसल्याच्या मुडमध्ये आहेत.त्यामुळे नियमाचा फज्जा उडाला असून कोरोनाची पुन्हा उद्रेक अटळ आहेजत 7,रेवनाळ 1,निगडी खु 5,देवनाळ 1,बिळूर 1,सिंदूर 1,डफळापूर 1,बाज‌ 2,शिंगणापूर 3,कोसारी 9,बागलवाडी 2,शेगाव 2,वाळेखिंडी 1,बनाळी 3,गुळवंची 3,सिंगनहळ्ळी 1,उमदी 1,निगडी बु.4,जालीहाळ बु.1,सिध्दनाथ 1,असे 50 रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील रुग्ण संख्या 11,320 पोहचली आहे, तर 10,589 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


दरम्यान जिल्ह्यात आज दिवसभरात 1,271 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.महापालिका क्षेत्र 228 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर जिल्ह्यातील 19 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 10,010 रुग्ण उपचाराखाली आहेत.शनिवार पर्यत एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1 लाख 56 हजार 053 तर आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1 लाख 41 हजार 793 वर पोहचली आहे.म्युकर मायकोसिस ;आज 2 नवे रुग्ण आढळले आहेत,एकूण रुग्ण  310 झाली आहे तर 29 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.