सिंदूर लक्ष्मण यांच्या कुटुंबास स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा द्यावा ; अरूण लाड

जत : शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यलढ्यात
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यासह
कर्नाटकातील चार जिल्ह्यांत
इंग्रजांविरोधात उठाव करून हौतात्म्य
पत्करलेले क्रांतिवीर वीर सिंदूरलक्ष्मण
यांच्या कुटुंबास स्वातंत्र्यसैनिकाचा
दर्जा द्यायला हवा, अशी मागणी
आमदार अरुण लाड यांनी केली.
सिंदूर (ता. जत) येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीमार्फत क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतिशताब्दी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणून बोलत होते. यावेळी लाड यांच्याकडून सिंदूर लक्ष्मण यांच्या पुतळ्यासाठी मदत देण्यात आली.क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अँड.सुभाष पाटील,प्रा.दादासाहेब ढेरे,स्मृतीशताब्दी समितीचे सचिव मारूती शिरतोडे,संरपच गंगाप्पा हारूगिरे,सुरेश मुडशी प्रमुख उपस्थित होते.प्रा.गौतम काटकर,व मानसिंगराव कुमठेकर यांचा सत्कार करण्यात आला. संयोजन बी.आर.पाटील व प्रा.हणमंत मगदूम यांनी केले.


यावेळी बी.आर.पाटील,सुरेश मुडशी,शिवानंद हारूगिरी,अप्पासाहेब ‌मुल्ला,वीर लक्ष्मणचे कुंटुबातील पणतू राम नाईक,लक्ष्मण नाईक उपस्थित होते.

सिंदूर ता.जत येथे आमदार अरूण लाड यांच्याहस्ते सिंदूर लक्ष्मण यांचे पणतू राम नाईक व लक्ष्मण नाईक यांचा सत्कार करण्यात आला.