जत तालुक्यात गुरूवारीही रुग्णसंख्या पन्नासीत

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी 48 नव्या रुग्णांची नोंद झाली.
तर 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या 565 रुग्ण उपचाराखाली आहेत.
विशेष म्हणजे बुधवारी अचानक रुग्णाची संख्या वाढल्याने गुरूवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी महसूल,पोलीस,नगरपरिषद अशी टीम जत शहरात उतरली होती.


बंद काळात दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरात दुकाने बंद होती.


जत शहर 12,पाच्छापूर 1,अमृत्तवाडी 1,काराजनगी 1,पांडोझरी 1,सिध्दनाथ 2,जालिहाळ बु.1,मेंढेगिरी 4,रावळगुडेंवाडी 2,व्हसपेठ 6,माडग्याळ 3,लकडेवाडी 1,कुलालवाडी 1,गुळवंची 2,हिवरे 2,धावडवाडी 1,जिरग्याळ 2,डफळापूर 3,बेंळूखी 1,खलाटी 1 असे 48 रुग्ण आढळून आले आहेत.


त्यामुळे एकूण संख्या 11,562 झाली असून त्यापैंकी 10,728 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.269 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
तालुक्यातील रुग्ण वाढीचा दर दिवसेन् दिवस वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त होत आहे.