बेंळूखीत दुकानास आग,पाच लाखाचे नुकसान

डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथे नव्याने बांधलेले केशव बळी चव्हाण यांच्या किराणा दुकानाला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.बेंळूखी येथील मुख्य चौकात चव्हाण यांनी नुकतीच नविन इमारत बांधली आहे.तीन दिवसापुर्वी त्यांनी तेथे किराणा दुकान सुरू केले होते.

रविवारी रात्री ते दरदिवशी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते.मध्यरात्री दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्या.त्यातच आग अचानक भडकली गावातील तरूणांनी पाणी मारून आग विझवली मात्र तोपर्यत दुकानातील साहित्य जळून खाक झाले.त्यात सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.घटनेचा गावकामगार तलाठी सौ.भोसले,पोलीस पाटील,बाबासाहेब शिंगाडे यांनी पंचनामा केला आहे.