डफळापूर तलावामध्ये अनओळखी युवकांचा मृत्तदेह आढळला

जत,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील तलावाच्या कँनॉलमध्ये 20 ते 25 वर्षाच्या युवकांचा अनओळखी संशयास्पद मृत्तदेह आढळून आला आहे.

सायकांळी 5 वाजण्याच्या सुमारास मोटारी चालू करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना हा मृत्तदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण यांनी जत पोलीसात वर्दी दिली आहे.


दरम्यान मृत्तदेहाचा तपास लावण्याचे जत पोलीसाकडून रात्री उशिरापर्यत प्रयत्न सुरू होते.दरम्यान चार महिन्यापुर्वी तलावात असाच एक अनओळखी मृत्तदेह आढळून आला आहे, त्यांचीही अद्याप ओळख पटलेली नाही.त्यातच रविवारी दुसरा अनओळखी मृत्तदेह आढळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. जत,कवटेमहांकाळ, उमदी,मिरज,सांगोला,कर्नाटकातील अथणी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली असून कुठे अशा वयाचा युवक हरविला आहे का,यांचीही माहिती पोलीस तपासत आहेत.