येळवीत महिलेचा मृत्तदेह सापडला

जत,‌संकेत टाइम्स : येळवी ता.जत येथे एका तीस वर्षीय महिलेचा मृत्तदेह आढळून आला आहे.
गणेश खांडेकर यांच्या घरासमोर ही महिला मृत स्थितीत आढळून आली आहे.उंची 5 फूट, रंग- निमगोरा, नेसणे हिरव्या रंगाची साडी व ब्लाऊज, गळ्यात बनावट मंगळसूत्र, कानात रिंगा, पायात पंजन, उजव्या हाताचे पोटरीवर अमोल असे गोंदन, डाव्या हातावर लव चिन्ह त्यामध्ये एस,असे वर्णन मृत्तदेहाचे आहे.दरम्यान उशिराने या मृत्तदेहाची ओळख पटली असून कर्नाटकातील जमखंडी येथील ही महिला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. येळवी येथील एकाने पाच दिवसापुर्वी तिच्याशी लग्न करून तिला येळवीत आणल्याचे समोर आले असून महिलेचा पोटाच्या विकाराने मुत्यू झाल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहेत. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.