बसपचे अतुल कांबळे पुन्हा राजकारणात सक्रीय | नगरपरिषदेला स्वतंत्र पँनेलची तयारी

जत,संकेत टाइम्स : एकेकाळी जत शहराच्या‌ राजकारणात दरारा असणारे‌‌ नेते,गेल्या काही दिवसापासून राजकारणा पासून काहिसे बाजूला गेलेले जतचे माजी संरपच,तथा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी अतुल कांबळे हे पुन्हा शहरातील राजकारणात सक्रीय होत आहे.
येत्या नगरपरिषद निवडणूकीत बहुजन समाज पार्टी स्वतंत्र पँनेल करून लढणार असल्याचे स्पष्ट झाले,असून तशी तयारीही कांबळे यांनी सुरू केली आहे.2007 साली तत्कालीन जत ग्रामपंचायतीचे संरपच असणारे अतुल कांबळे शहरातील ताकतवान नेते म्हणून
उदयास आले होते.2017 सालच्या जत नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या हत्ती या चिन्हावर स्वबळावर एक नगरसेवक निवडून आणला होता. 
कांबळे यांना माननारा मोठ्या प्रमाणात मतदार जत शहरात आहे. त्यामुळे कांबळे पुन्हा नव्या जोमाने सक्रीय झाले आहेत.2022 साली होणाऱ्या जत नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली असून सर्व प्रभागामध्ये उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.त्या अनुषंगाने दोन बैठका झाल्या आहेत.बसपा नगरपरिषद निवडणूक स्व:बळावर लढणार असून प्रंसगी समविचारी पक्षांबरोबर युती करण्याचाही निर्णय होऊ शकतो,असे बसपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
दरम्यान फायरब्रँड नेता असलेले
अतुल कांबळे राजकारणात पुन्हा जोमाने सक्रीय होत असल्याने बसपात नवचैतन्य संचारले असून अनेक युवक पक्षामध्ये सामिल होत आहेत.