बेंळूखीत कोविड लसीकरण शिबिरा‌स प्रतिसाद

डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथे सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डफळापूर पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या पुढाकारांने कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


या शिबिरासाठी‌ शंभर लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.त्या अगदी काही तासात संपल्या,लसीच्या तीनपट लस घेणारे नागरिक उपस्थित होते.त्यामुळे अनेकांना लसीविना माघारी फिरावे लागले.आनखीन एक दिवस अशाच पध्दतीने एक शिबीर आयोजित करावे,अशी नागरिकांनी मागणी केली.

बेंळूखीचे माजी उपसंरपच संभाजी कदम,पोलीस पाटील बाबा‌साहेब शिंगाडे,राजू चव्हाण यांनी बेंळूखीत लसीकरण शिबिर आयोजित करण्याची विंनती दिग्विजय चव्हाण यांना केली होती.त्यांनी तात्काळ डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क करत हे नियोजन केले होते.