प्रकल्प ‘मिशन मोड’ वर : जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील

0



मुंबई : जलसंपदा विभागामार्फत होत असलेल्या प्रकल्पांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली. येत्या दोन वर्षात महत्वपूर्ण असे 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे, असे सांगितले. त्यांनी विभागाच्या नदीजोड/वळण योजना राबविण्याबाबत अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेला प्रदेश आणि पाण्याची तूट असलेला प्रदेश यांची माहिती दिली. 






यात पूर्व विदर्भ (वैनगंगा खोरे), नार पार-दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोरे, पिंजाळ, उल्हास खोरे यात अतिरिक्त असलेले पाणी अनुक्रमे विदर्भातील अवर्षण प्रवण भाग, मराठवाडा व खानदेश, नाशिक तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे (घरगुती व औद्योगिक वापर) या पाण्याची तूट असलेल्या प्रदेशात देण्याबाबतची माहिती दिली. 

Rate Card





पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्या ठिकाणी पाणी मिळाल्यानंतर त्या भागात महत्वाचा बदल होईल. सिंचन क्षेत्र वाढेल असेही ते म्हणाले. तसेच वळण बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे. हे प्रकल्प ‘मिशन मोड’ म्हणून हाती घेण्यात येत आहेत, असे ना. श्री. जयंतराव पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.