जतेत‌ आदेशाची पायमल्ली,कसा रोकणार कोरोनाचा संसर्ग | आठवडा बाजार भरला ; यंत्रणांचे दुर्लक्ष

जत,संकेत टाइम्स : जिल्हाधिकारी श्री. अभिजीत चौधरी यांनी जिल्हयातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असतानाही जत शहरात मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करित आठवडी बाजार भरविल्याने कोरोनाचे तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले आहे. 
जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्णसंख्येत चढउतार होताना दिसत आहे. त्यातच जत शहरालगत असलेल्या मळगेवस्ती या ठिकाणी कोरोनाने एकजण दगावल्याने या वस्तीमधिल इतर लोकांची कोरोना टेस्ट केली असता या ठिकाणी नव्यानेच एकोणतीस जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले.जत नगरपरिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या वस्तीवर जाणारे रस्ते बंद केले होते.
या वस्तीवरील कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले,असलेतरी येथिल काही पाॅझीटीव्ह व्यक्ती जत शहरात फिरताना दिसत आहेत,ही गंभीर बाब आहे. 
आठवड्याचा बाजार मंगळवारचा होता.जिल्हाधिकारी श्री.अभिजीत चौधरी यांनी जिल्हयातील सर्वच आठवडी बाजार न भरविण्याचे आदेश प्रशासनाला दिले,असताना जत मध्ये आठवडी बाजार भरलाच कसा ,मागील आठवड्यात उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यानी माडग्याळ येथील भरविण्यात आलेला आठवडी बाजार बंद केला होता. तसेच जत पोलीसांनी डफळापुर येथे भरलेला आठवडी बाजार बंद करण्यास सांगितले होते. 


मग जत येथिल आठवडी बाजाराबाबत जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते.जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांना कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नाही. हे आज भरलेल्या जत येथिल आठवडी बाजारावरून दिसून येत आहे. 

    


जतेत मंगळवार आठवडी बाजार, महाराष्ट्र बेंदूर,बकरी ईद मुळे जत बाजारपेठेत तोबा गर्दी,जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करतानाचे चित्र होते.